Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवारपासून सुरुवात – तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

by admin
in ब्रेकिंग
A A
0

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवार (दि. २२) पासून सुरुवात होत आहे. या निमित्त सालाबादप्रमाणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीरशैव सामाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे जेवळी येथे पुरातन मंदिर आहे. अनेक वर्षापासून येथे परंपरेने महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयेपासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. ही यात्रा यावर्षी शनिवार (दि. २२) ते सोमवार (दि.२४) या कालावधीत पार पडत आहे. या परिसरात ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. शनिवारी (दि. २२) बसवेश्वरांच्या जयंतीदिनी पहाटे पाच वाजता बसवेश्वर मंदिरातील शिवलिंगास महाभिषेकानी या यात्रेला प्रारंभ होते. त्यानंतर सकाळी आठ वाजता सालाबादप्रमाणे १०१ बैलजोड्याची गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात येते. या नंतर मंदिरासमोरील मैदानावर जिल्हास्तरीय पशु प्रदर्शन व उत्कृष्ट पशुधनास बक्षिसांचे वाटप केले जाते. सायंकाळी चार वाजता महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर प्रवचन, तर रात्री दहा वाजता मंदिरासमोरील मैदानावर अक्षता सोहळा व नंदी कट्ट्यांवर अग्नीप्रज्वलन कार्यक्रम पार पडते.

\"महात्मा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता नंदीध्वज आणि बसवेश्वरांच्या पालकीसह गावातील मुख्य रस्त्यावरुन विविध कलापथक, सवाद्य मिरवणुक, अकरा वाजता नंदिकोलासह अग्नीस्पर्श तर रात्री नऊ वाजता सजविलेल्या नंदी ध्वज, विविध चित्ररथासह छबिना मिरवणुक निघेल. रात्री अकरा वाजता शोभेचे दारु काम मंदिरा समोरील मैदानावर पार पडणार आहे.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.२४) अकरा वाजता भारुडाची जुगलबंदी, दुपारी चार वाजता कुस्त्यांची दंगल पार पडणार आहे. या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष बसवराज कारभारी व सचिव मल्लिनाथ डिग्गे यांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: महात्मा बसवेश्वर
Previous Post

खेड येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

Next Post

वृक्ष संवर्धन : झाडांना टँकरने पाणी देऊन केला वाढदिवस साजरा – निसर्ग संवर्धन संस्थेचा पुढाकार

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

वृक्ष संवर्धन : झाडांना टँकरने पाणी देऊन केला वाढदिवस साजरा - निसर्ग संवर्धन संस्थेचा पुढाकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!