वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायतमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तो कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने पत्राद्वारे कळविले आहे. सदर निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येईल. तसेच निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे जाहीर करण्यात आलेली आचारसंहिता आता लागू राहणार नाही असेही या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आदेश खालीलप्रमाणे –