वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी मुख्तार चाऊस यांची तर जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मुख्तार चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद येथील कार्यालयात ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.