वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी शुक्रवारी ( दि. ७) भेट देऊन प्रमुख पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, उपसरपंच व गाव प्रमुखांसह बैठक घेतली.
यावेळी औषध पुरवठा, तपासणी, जेवण, स्वच्छता यासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेळेचे नियोजन इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात आली. या आयसोलेशन केंद्रात परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असून सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्याशी चर्चा करून पोलीस कर्मचारी उपलब्ध करणेबाबत सुचवले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर (नाना) साठे, सरपंच विठठल साठे, उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, शिवाजी साठे सर, पंडित ढोणे, उमाशंकर कलशेट्टी, गोविंद चव्हाण, गोविंद साठे, विकास भोरे, वैद्यकीय अधिकारी संतोष मनाळे, गोपाळ ढोणे, अच्युत चिकुंद्रे, पोपट पवार, ओंकार साठे, बाळू कांबळे, सुभाष आळंगे आदी उपस्थित होते.