वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बळी इंगळे तर व्हाईस चेअरमन पदी सुशांत रसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील लोहारा खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. ही निवडणूक बिनविरोध झाली होती. या संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी शनिवारी (दि.१५) संस्थेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात चेअरमन पदी बळी इंगळे तर व्हाईस चेअरमन पदी सुशांत रसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभूते हे होते. यावेळी नूतन संचालक मुकुंद इंगळे, सुशांत रसाळ, सुग्रीव पाटील, महादेव पाटील, किसन रसाळ, बळी इंगळे, दत्ता आरगडे, काशिनाथ कांबळे, मुद्रिकाबाई मुरटे, सुमन रसाळ, धनाजी सूर्यवंशी, भागवत इंगळे उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर माजी सरपंच शेखर पाटील यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शेखर पाटील, माजी चेअरमन मुकुंद इंगळे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते. बिनविरोध निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.