वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरु केलेल्या २५ बेडच्या आयसोलेशन केंद्राचे उद्घघाटन बुधवारी (दि.२८) तहसीलदार संतोष रुईकर व किशोर साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विठ्ठल साठे होते. कार्यक्रमासाठी लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी माने, उपसरपंच वामन भोरे, अँड विश्वनाथ पत्रिके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील माकणी येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. येथील रुग्णांना उपचारासाठी लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद याठिकाणी पाठविले जात होते. परंतु अनेकवेळा बेड न मिळणे, वेळेत उपचार न मिळणे अशी गैरसोय होत होती. त्यामुळे आपण गावातच २५ बेडचे आयसोलोशन कक्ष लोकसहभागातून सुरु करण्याचा विचार ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन हा विषय त्यांच्या समोर मांडला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी याला होकार देऊन सर्वोतपरी मदत करण्यास संमती दर्शविली. यामुळे हे २५ बेडचे कोरोना आयसोलोशन कक्ष सुरु झाले आहे. यामुळे आता गावातील कोरोना रुग्णांची गावातच सोय होणार आहे. लोकसहभागातून उभारलेल्या या आयसोलेशन कक्षाला आवश्यक ती मदत करू असे आश्वासन तहसीलदार संतोष रुईकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिले आहे. यासाठी एक कोरोना दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून गावातील नागरिकांनी या आयसोलेशन कक्षासाठी मदत करावी असे आवाहन केले आहे. यावेळी कोरोना सहाय्यता दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच विठ्ठल साठे, उपाध्यक्ष तथा उपसरपंच वामन भोरे, सदस्य दादादासाहेब मुळे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पंडित ढोणे, अँड. दादासाहेब जानकर, प्रा. सिध्देश्वर साठे, सुभाष आळंगे, ओमकार साठे, संजय साठे, उमेश कडले, बालाजी साठे, शिवाजी साठे, ग्रा.प.सदस्य अशोक साठे, सरदार मुजावर, अभिमन्यु कुसळकर, गोवर्धन आलमले, अच्युत चिकुंद्रे, बाळू कांबळे, ग्रामस्थ उमाशंकर कलशेट्टी, गोपाळ ढोणे, पोपट पवार, शुभम साठे, ग्रामविकास अधिकारी महादेव जगताप, तलाठी वाजिद मनियार, वैद्यकीय अधिकारी संतोष मनाळे आदी उपस्थित होते.