वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (दि. १४) विशेष सभा होणार आहे. या निवडी झाल्यानंतर दुपारी एक वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहारा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडीसाठी सोमवारी (दि.१४) दुपारी १२.३० वाजता नगरपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा होणार आहे. त्यानंतर नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते हे सत्कार होणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ज्ञानराज चौगुले राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिवसेनेचे पक्ष निरीक्षक अनंत पताडे राहणार आहेत. यावेळी शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, किशोर साठे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विजय लोमटे, रजाक अत्तार, अबुलवफा कादरी, नागन्ना वकील, शिवाजी कदम यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमास लोहारा व परिसरातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पनुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले आहे.