वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (दि. ४) आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा मार्केटींग फेडरेशनने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड मार्फत लोहारा येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी तालुक्यातील नागूर येथील यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादने विकास सहकारी संस्थेला दिली आहे. त्यानुसार या संस्थेकडून लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या आधारभूत हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ गुरूवारी (दि.४) किल्लारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी कदम, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक दिनकरराव जावळे, नगरसेवक अभिमान खराडे, प्रताप पाटील, तलाठी जगदीश लांडगे, सुधीर घोडके, विनोद जावळे, ज्ञानेश्वर सोमवंशी, सलीम शेख, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सद्यस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही अशांनी बँक खाते पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड, सातबारा, आठ अ, तलाठ्याचे पीक पेरा प्रमाणपत्र आदी कागदपत्रे घेऊन संस्थेकडे तत्काळ ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जावळे यांनी केले आहे.