वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील कु. दिक्षा गायकवाड या गरीब कुटूंबातील विद्यार्थिनीस सीईटीच्या शिक्षणासाठी उमरगा शहरातील सामाजीक कार्यकर्त्या सौ. भाग्यश्री साखरे यांच्या वतीने गुरुवारी (दि.२६) मायक्रोकॉम कॉम्प्युटर येथे दहा हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.
बारावी पास असलेल्या दिक्षाचे वडील सिध्देश्वर गायकवाड डोळयाने अंध असुन आई हाताने अपंग आहे. दिव्याला लातुर येथे सीईटीच्या शिकवणीसाठी पैसे नसल्याने ती घरीच बसुन होती. सौ. साखरे यांना प्रा. युसुफ मुल्ला यांच्याकडून ही माहीती समजली. आपल्या वाढदिवसाला होणारा ईतर खर्च टाळून पैशाअभावी शिक्षणापासुन वंचीत असलेल्या कु. दिक्षाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. सौ. साखरे यांनी यापुर्वी आपल्या वाढदिवसानिमीत्त डिग्गी येथील वृक्षसंवर्धनाला आर्थिक मदत दिली होती. त्यांचा नेहमीच अशा सामाजीक कार्यात सहभाग असतो. आर्थिक अडचणीमुळे घरी बसलेल्या दिक्षाला योग्य वेळी मदत मिळाल्याने ती खुपच भावुक झाली होती. दिक्षाच्या आई- वडीलांनी मुलीला योग्य वेळी मदत मिळाल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, नगरसेवक महेश माशाळकर, शिरीष कडगंचे आदी उपस्थित होते.