वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील सुपुत्र फिडे या जागतिक स्तरावर कार्यरत फेडरेशनमध्ये बुद्धिबळ खेळाचे कोच म्हणून कार्यरत असलेले शशिकांत मक्तेदार यांचा अष्टविनायक क्लासेसच्या वतीने करण्यात आला.
लोहारा शहरातील शशिकांत मक्तेदार यांचे शिक्षण लोहारा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे लातुर येथील शाहु कॉलेज मध्ये पुर्ण केले. कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेत बुद्धिबळ खेळात ही नाविन्यपूर्ण यश संपादन केले. बुद्धिबळ खेळातील त्यांचे कौशल्य लक्षात घेऊन फिडे या जागतिक स्तरावरील फेडरेशनने शशिकांत मक्तेदार यांची कोच म्हणून निवड केली आहे.
त्याबद्दल लोहारा शहरातील अष्टविनायक क्लासेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, दयानंद फरीदाबादकर, अब्बास शेख, गिरीश भगत, गणेश खबोले, दिनेश झिंगाडे, कृष्णा पोतदार, बाबा बादुले, सागर स्वामी आदींची उपस्थिती होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना शशिकांत मक्तेदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बुद्धिबळ तसेच त्यांच्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले. तसेच लोहारा शहरातील बुद्धिबळ खेळाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी बुद्धिबळाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दयानंद फरीदाबादकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अजित विभूते यांनी प्रास्ताविक केले. अमित बोराळे यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. अष्टविनायक क्लासेस मधून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये किंमतीचे बुद्धिबळ किट देण्यात येणार असल्याचे शशिकांत मक्तेदार यांनी जाहीर केले.