शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. आसमानी संकट, सावकारी दुष्टचक्र यातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं, अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना घातली. पुढे ते म्हणाले की, मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना… चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे यांचे पत्र