वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ग्रामीण भागात दिवसेंदिवस कमी होत चाललेली मजुरांची संख्या व त्यामुळे शेतातील कामावर पडणारा ताण या परिस्थितीत शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर खूप उपयुक्त ठरेल. याच अनुषंगाने तालुक्यातील उदतपुर येथील एका तरुण शेतकऱ्याने शेतीत यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या यांत्रिकीकरणा संबंधीच्या गरजा ओळखून त्यांना बाहेरच्या मार्केट मध्ये जाऊन शेतीसंबंधी यंत्रांची गरज आपल्याच भागात पूर्ण करता येईल यासाठी आपणच व्यवसाय उभा करून त्यांच्या गरजेनुसार त्यांना एकदम योग्य दरामध्ये शेतीसंबंधी साहित्य पुरविण्याच्या उद्देशाने माऊली इंटरप्रायझेस ची सुरुवात करण्याचा संकल्प केला आहे. पुढील आठवड्यात याची सुरुवात होणार आहे.
आपल्या देशातील राजकारण, समाजकारण व अर्थकारण शेतीशी निगडित झाले आहे. मागील काही वर्षांपासून शेतीविषयी कमालीचे नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शेतीत काम करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची समस्येमुळे तर शेतकरी त्रस्त झाला आहे. या परिस्थितीत यांत्रिकीकरण केले शेतीसाठी खूप उपयुक्त राहील असा विचार एका तरुण शेतकऱ्याच्या मनात आला. सध्याच्या शेतीबद्दल च्या या नकारात्मक वातावरणात लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील एका तरुण शेतकऱ्याने शेतीत यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. या तरुण शेतकऱ्याचे नाव व्यंकटराव माधवराव पाटील आहे. व्यंकटराव पाटील यांनी बी. कॉम चे शिक्षण पूर्ण केले असुनही नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा संकल्प केला. त्यांचे वडील माधवराव पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. शेतीत यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात करताना व्यंकटराव पाटील यांनी दहा एच. पी. च्या पाॅवरविडरवर अगदी पडून असलेल्या साहित्याचा वापर करून फवारणी यंत्र विकसित केले. खरीप सोयाबीन पासून प्रत्यक्ष वापरही चालू केला. दररोज कमीत कमी वीस एकरची फवारणी सध्या होत आहे. फवारणीसाठी सतत भेडसावणाऱ्या मजुरांच्या समस्येवर त्यांनी एक कायमस्वरूपी पर्याय शोधला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सास्तूर येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात व्यंकटराव पाटील यांनी तयार केलेले दहा एच. पी. च्या पाॅवरविडर फवारणी यंत्राची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी स्वतः दिली. यावेळी उपस्थित अधिकारी, शेतकरी यांनी त्यांचे कौतुक केले होते.
शेतकर्यांनी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत निराश न होता ती एक संधी म्हणून पाहिले तर खूप मोठे परीवर्तन सहज शक्य आहे. मी बनवलेल्या या फवारणी यंत्राने मोठ्या समस्येवर मात केलेली आहे. एक लिटर डिझेल मध्ये एका तासात चार एकर क्षेत्रावर फवारणी होत आहे. हे फवारणी यंत्र कोणीही सहज चालवू शकतो. दहा नौजलद्वारे एक समान फवारणी होत आहे. शेतकरी बांधवांनी गरजेनुसार यंत्रे बाजारात उपलब्ध असतिल तर ठिक, नाहीतर गरजेनुसार बनवून वापरावीत. पण शेती मात्र यंत्रावरच करावी. कारण ती आज काळाची गरज बनत चाललेली आहे असे मत शेतकरी व्यंकटराव पाटील यांनी व्यक्त केले.
सध्या शेतीसाठी यांत्रिकीकरणाची आवश्यकता ओळखून शेतकरी बांधवांच्या गरजा ओळखून त्यांना बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन शेतीसंबंधी यंत्रांची गरज आपल्याच भागात पूर्ण करता येईल यासाठी एक शेतकरी या नात्याने आपणच व्यवसाय उभा करून त्यांच्या गरजेनुसार त्यांना एकदम योग्य दरामध्ये शेतीसंबंधी साहित्य पुरविण्याची शेतकरी पाटील प्रयत्न करत आहोत. त्यासाठी त्यांनी माऊली इंटरप्रायझेसची पुढील काही दिवसांत सुरुवात करत आहेत. पूर्णपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे एकदम उच्च दर्जाचे उत्पादने बनवतात तेच ब्रँड्स घेवून आपण शेतकऱ्यांना योग्य त्या भावात मिळवून देवून शेतकऱ्यांचे हित व्हावे, आम्हाला ज्या झळा पोहचल्या आहेत, त्या दुसऱ्यांना पोहचू नये हाच आमचा उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले.