वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील काटेवाडी येथे सास्तूर येथील प्राईड इंडिया स्पर्श रुग्णालयाच्या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटमार्फत दोन दिवसात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदर फिरते आरोग्य वाहन हे अत्यंत दुर्बल वाड्या-वस्त्यांवर जावून मोफत रुग्णांची तपासणी केली जात आहे. स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आदी फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटद्वारे आरोग्य तपासणी, औषधोपचार, लसीकरण, गरोदर माता प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात सेवा, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, उपचार, रक्त, लघवी तपासणी व इ.सी.जी या सर्व सेवा सुविधा पुरविल्या जात आहेत. या आरोग्य तपासणीचा शुभारंभ गुरुवारी ( दि. २९ ) सरपंच रणजीत गायकवाड, रामराव जाधव, डॉ. भालचंद्र भोसले, शांत काकडे, राम मुगले, नंदकिशोर भोसले, सचिन भोसले, रवी भोसले, राम क्षीरसागर, आशाताई विद्या मरकड, कुंडलिक क्षीरसागर, मनोज सूर्यवंशी, फातीमा जमादार, अंगणवाडी सेविका उर्मिला कांबळे, इमाम सोलापूरे, राम इंगोले, मदतनीस लक्ष्मीबाई सुर्यवंशी, चंद्रकांत सुर्यवंशी, गोपीनाथ भोसले आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. दोन दिवस चालू असलेल्या रुग्ण तपासणीचा शिवाजी भोसले, रमेश मरकड, रमेश भोसले, सिताराम जाधव, मुकुंद भोसले, जनक इंगोले, महेबुब मुल्ला, भीमा काकडे, नितीन भोसले आदी रुग्णांनी या सेवेचा लाभ घेऊन या सेवेबद्ल समाधान व्यक्त केले.