वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील चिंचोली (काटे) येथील शोभा गोविंद करदुरे यांची अखिल विश्व वारकरी परिषदेच्या लोहारा तालुका सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.
वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच समाजप्रबोधनातून सकळ जनांचे कल्याण ही परिषदेची विचारधारा आहे. या विचारधारेला अनुसरूनच आपल्या आजवरच्या कार्याची वाटचाल सुरू आहे. आपल्या हातून हे कार्य भविष्यात आणखी जोमाने होईल या दृढ विश्वासातून आपली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे असे करदुरे यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे. अखिल विश्व वारकरी परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष ह. भ. प. गुंडू भोसले महाराज, रामपूरकर यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे. या निवडीबद्दल शोभा गोविंद करदुरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.