वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशात कोरोना विरुद्धचा लढा तीव्र करताना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. 45 वर्षांवरील लोकांना नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे. मात्र, 18 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी कोविन अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक होते. तसेच चार आकडी कोड नंबरही आवश्यक करण्यात आला होता. मात्र, आता याची आवश्यकता लागणार नाही. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांना व्हॅक्सिनबाबतच्या नियमात बदल केला आहे. या नवीन नियमानुसार नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर डोस घेता येणार आहे.
भारतात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवरुन अपॉईंटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. परंतु आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा नियम बदलला आहे आणि आता या वयोगटातील लोकांना लसीकरण केंद्रात जाऊन थेट लसीकरण करता येईल.
आता ऑनलाइन नोंदणीची सुविधा
कोरोना लसीसाठी ऑनसाईट नोंदणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी देखील उपलब्ध असेल. आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक लसीकरण केंद्रांवर जाऊन थेट लस घेऊ शकतात.
कशी मिळणार ऑनसाईट व्हॅक्सिन
लसीकरणाची वेळ संपली की लस वाया घालवू नये म्हणून ऑनसाईट व्हॅक्सिनची संकल्पना पुढे आली आहे. लस दिवसातील शेवटच्या वेळी वाचविली जाईल, अशी योजना ऑनलाईन व्यवस्था अंतर्गत लोकांना दिली जाईल. कोविन प्लॅटफॉर्मवर या नवीन प्रणालीचा उल्लेख केला जात आहे. सध्या ही नवीन सुविधा केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असेल.
सरकारने नियमात का केला बदल ?
खरं तर, लसकरणासाठी स्लॉट बुक करुनही बरेच लोक लसीकरण केंद्रावर पोहोचत नाहीत आणि यामुळे लस खराब झाल्याचे वृत्त आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय ग्रामीण स्तरावर ऑनलाईन बुकिंगची माहिती नसल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे लसीकरणाच्या नियमात बदल करण्यात आला आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!