वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्याचा क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकर याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १.५ कोटींना विकत घेतले आहे. त्यामुळे राजवर्धन हंगरगेकर हा आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर ठरला आहे. याबद्दल राजवर्धनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आयपीएल २०२२ मेगा लिलावाचा दुसरा दिवस बंगळुरू मध्ये सुरू आहे. भारताने नुकताच पाचव्यांदा १९ वर्षाखालील वल्ड कप जिंकला आहे. या संघातील दमदार कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंना लिलावात उतरवले होते. यात उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याचाही समावेश होता. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १.५ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज व आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याने १९ वर्षांखालील वल्डकपमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या अनुभवी खेळाडूच्या सानिध्यात राजवर्धन हंगरगेकर राहणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याला याचा मोठा फायदा होणार आहे. आयपीएलच्या लिलावात राजवर्धन हंगरगेकरचा चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश झाल्याचे समजताच त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.