Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आरणी ठरले लोहारा तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले गाव

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आरणी हे १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे.
लोहारा तालुक्यातील आरणी येथे दि. १ नोव्हेंबर रोजी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोविड लसीचे पहिल्या डोसचे १०० टक्के लाभार्थी पूर्ण करण्यात आले. गावाची लोकसंख्या १३७१ असून यापैकी लसीकरणास पात्र ७४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पात्र लाभार्थ्यां पैकी शेवटचे १०० नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी आरणीच्या सरपंच सविता संगशेट्टी, उपसरपंच सिद्धेश्वर लादे, आरोग्य सहायिका माने सिस्टर, आरोग्य सेविका बिराजदार सिस्टर यांनी सदर नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना लस घेण्यास तयार केले. लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज १२ ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले जात आहेत. या व्यतिरिक्त प्रा. आ. केंद्र कानेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदिछोडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनानुसार मोबाईल टीम तयार करून स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून सत्राच्या वेळेनंतरही नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले आहे.\"\"गावातील १०० टक्के पात्र लाभार्थीनी लस घेतल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, कानेगाव यांनी सरपंच सविता संगशेट्टी, उपसरपंच सिद्धेश्वर लादे, ग्रामसेवक पी. जे. देडे यांचे आभार व्यक्त केले. तसेच दुसऱ्या डोस देय लाभार्थींना सुद्धा प्रवृत्त करुन दोन्ही डोस पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सेवक तसेच गावातील मदत करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९लसीकरण
Previous Post

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाच्या मेडिकल युनिट च्या माध्यमातून १२६ गावात मिशन कवच कुंडल अभियान सुरु

Next Post

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल कोळी परिवाराच्या वतीने सत्कार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल कोळी परिवाराच्या वतीने सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!