वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ अतिरिक्त व मोफत देणे या योजनेचा शुभारंभ आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व तहसीलदार संतोष रुईकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.२१) करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाद्वारे या योजनेअंतर्गत २ महिने प्राधान्य कुटुंबांच्या व अंत्योदय योजनेतील कुटुंबांच्या लोकांसाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ अतिरिक्त व मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२१) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्य देऊन करण्यात आला.
यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार रणजित शिराळकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, स्वस्त धान्य दुकानदार इनुस पटेल, श्रीकांत भरारे, नामदेव लोभे, मुन्ना फकीर, महेबूब गवंडी, जगदीश लांडगे, परवेज तांबोळी, अमीन सुंबेकर, प्रेम लांडगे, शिवा सुतार आदी उपस्थित होते.