Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा कोरोना काळात मदतीचा हात – संस्थेने सुरू केले 25 बेडचे कोविड विलगीकरण केंद्र

admin by admin
22/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर खूपच ताण आलेला आहे. ऑक्सिजनची गरज पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशा अवघड परिस्थितीत लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मदतीचा हात पुढे केला असून आज शुक्रवारी ( दि.२१) संस्थेमार्फत ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे पाच ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले. त्यामुळे आता अधिक गरजू रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करता येईल. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक गोविंद साठे, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे, संस्थेचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे, जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत पाटील, आरोग्य समन्वयक सचिन सूर्यवंशी, संतोष येवले आदी उपस्थित होते. या संस्थेचे कार्यकर्ते हराळी गावामध्ये घरोघरी जाऊन तापमान व ऑक्सिजन तपासणी करून कोविड संबंधात माहिती देत आहेत. तसेच कोविड शिवाय अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मोफत टेलीमेडिसिनद्वारा उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रातील डॉक्टर यासाठी मदत करत आहेत. तसेच लसीकरणाचे महत्व आणि आवश्यकता याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून हराळी गावातील 187 लोकांनी लस घेतली आहे. यासाठी संस्थेमार्फत वाहनांची व्यवस्थाही केली आहे. येत्या काळात इतर गावातही अशीच सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा आणि रुग्णांना गावाजवळच राहाता यावे या उद्देश्याने 25 रुग्णक्षमतेचे कोविड विलगीकरण केंद्र ज्ञान प्रबोधिनी हराळी संस्थेत सुरु करण्यात आले आहे. रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पाणी, स्वच्छता, औषधे अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोहारा येथील कोविड केंद्रासाठी संस्थेने 100 बेड्स दिले आहेत. परिसरातील इतर कोविड केंद्रांनाही संस्थेमार्फत आवश्यक ती मदत केली जात आहे अशी माहिती संस्थेचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे, आरोग्य समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविड विलगीकरण केंद्रज्ञान प्रबोधिनी
Previous Post

सोमवारी ( 24 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यातील 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर , सालेगाव, लोहारा (खुर्द), उदतपुर, विलासपूर पांढरी येथे होणार लसीकरण

Next Post

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोहारा येथे अंत्योदय व अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना धान्य वाटपाचा शुभारंभ

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोहारा येथे अंत्योदय व अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना धान्य वाटपाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's