उमरगा –
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमरगा शाखेत चोरट्यांनी तिजोरी फोडून चोरीचा प्रयत्न केला. गॅस कटरने चोरी करण्याच्या प्रयत्नात बाजूच्या कपाटातील कागदपत्रांना आग लागली. बँकेच्या सेवकाने सोमवारी (दि.११) सकाळी बँक उघडताना ही बाब लक्षात आली. त्यामुळे सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस पथक दाखल झाले आहे. उस्मानाबाद येथून श्वानपथक व ठसे तज्ञ दाखल होत आहेत. घटनेची माहिती मिळताच बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.