Vartadoot
Saturday, May 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद जिल्ह्यात ड्राय रन मोहीम

admin by admin
11/01/2021
in आपला जिल्हा, आरोग्य व शिक्षण
A A
0
Ad 10

लोहारा –

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि. ८) बहुचर्चित कोरोना लसीकरण संदर्भात ड्राय रन मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, प्रभारी तहसीलदार रोहन काळे, गटविकास अधिकारी एस ए अकेले आदीनी भेट देऊन आढावा घेतला.
कोरोना साथ रोगाने संपूर्ण जग हैराण झाले असताना आता यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणार आहे ही मोठी आशादायक बाब आहे. आता सुरुवातीला ही लस फ्रंटलाइन वर्कर्सना दिली जाणार असून या अगोदर या लसीकरण संदर्भात ड्रायरन (रंगिततालीम) मोहीम राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी येथे हे लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. लोहारा तालुक्यातील जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी दोन या काळात लसीकरण संदर्भात ड्रायरण पार पडली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष स्वच्छता करण्यात आली होती. आरोग्य केंद्र रांगोळी, फूलांनी व कोविड १९ साथरोग विषयी पोस्टर, बॅनरने सजविण्यात आले होते. यावेळी सुनियोजित शिस्तबद्ध अशी लसीकरणाची ड्रायरण (प्रात्यक्षिक) मोहीम पार पडली.  सकाळी अकरा वाजता येथील ड्राय रण मोहिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, विभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ गजानन परळीकर, तहसीलदार रोहन काळे, गट विकास अधिकारी एस ए अकेले, साहाय्यक गट विकास संजय ढाकणे, डॉ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सरपंच मोहन पणुरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आर के शेख, डॉ अमोल सूर्यवंशी, डॉ पी पी पिचे, ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात सुरुवातीला ८ हजार २७२ फ्रंटलाइन वर्करना लस द्यायचे असून अंतिम लसीकरण अभियान सुरू करण्यापूर्वी त्यातील अडचणी वेळीच लक्षात यावेत यासाठी लसीकरण संदर्भात ड्रायरण मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यात ड्रायरणसाठी तीन रुग्णालयाची निवड करण्यात आली. यात प्रत्येक ठिकाणी २५ असे एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष लस न देता लसीकरणाचे सर्व टप्पे राबविण्यात आले.

डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

उमरगा डी सी सी बँकेत चोरीचा प्रयत्न ; चेअरमन प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी केली घटनास्थळी पाहणी

Next Post

कोरोना लसीकरण मोहिमेत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून मोहीम यशस्वी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
Next Post

कोरोना लसीकरण मोहिमेत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून मोहीम यशस्वी करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's