वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माझे गाव माझी शाखा या उपक्रमाअंतर्गत उमरगा तालुक्यातील कोराळ येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.१९) युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या सुवर्णा दिलीप भालेराव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी, उस्मानाबाद युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार, उस्मानाबाद युवक काँग्रेस सचिव गौस शेख, उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड, उपाध्यक्ष यशपाल कांबळे, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी, नगरसेवक महेश माशाळकर, माजी उपसरपंच बालाजी वडजे, उपसरपंच विठ्ठल लाळे, विक्रम दासमे, रवि दासमे, राजू गायकवाड, उमरगा युवक काँग्रेस सोशल मीडीया उपाध्यक्ष अमरजित भगत, मराठवाडा समन्वयक सोशल मीडीया विभाग अॅड इरफान जमादार, उमरगा तालुका इनएसयुआय अध्यक्ष रत्नदिप भालेराव, माजी सरपंच सुनिल मुळे, माजी उपसरपंच भालचंद्र लोखंडे, सोमशंकर पाटील, संचालक विजय सोनकटाळे, सचिन बिराजदार,
संदिप बिराजदार, सौरभ बिराजदार, शाखाअध्यक्ष प्रशांत पाटील, शाखा उपाध्यक्ष रवि लाळे, कार्याध्यक्ष, दिनकर गायकवाड, कोषाध्यक्ष विजय आमाशेट्टे, सचिव विजय पवार, सहसचिव शेखर साळूंके, सदस्य धनराज जंगाले, विजय विष्णू पवार, संजय लाळे, बालाजी चोपडे, पांडूरंग गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.