वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवजयंती निमित्त शुक्रवारी (दि. १९) इंदापूर येथे जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्रीमती मंजुषाताई चव्हाण – पाटील यांना शिवभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात शिवजन्माच्या पाळण्याचे ही आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय इंदापूर बस स्टॅन्ड येथे मोफत भोजन थाळी चे उद्घाटन आणि शिवजयंती सजावट, स्पर्धा गौरी सजावट स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा विजेत्यांचा सत्कार, शिवजयंती महोत्सव दरम्यान उपस्थित जिजाऊंच्या वेशभूषेत आलेल्या जिजाऊंचा ही स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व जिजामाता इन्स्टिट्यूट सराटीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, इंदापूर पोलीस इन्स्पेक्टर मयुर पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. जयश्री गटकुळ, इंदापूर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष राहुल घोगरे, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष राहुल गुंडेकर, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष पूजा शिंदे, शहर प्रमुख राधिका शेवाळे, कल्पना भोर, शारदा स्वरांजली संगीत अकॅडमीच्या अध्यक्षा शारदा नागपुरे व जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर चे अध्यक्ष जयवंत नायकुडे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती मंजुषाताई चव्हाण – पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.