Thursday, November 5, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना समुपदेशन हेल्पलाईनची सुरुवात – मानसिक स्वास्थ्यासाठी होणार मदत – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्या काळात आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी, सकारात्मक व भयमुक्त ठेवणे आवश्यक असते. त्याच अनुषंगाने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर सल्ला आणि जागरूकता होणे आवश्यक आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना समुपदेशन हेल्पलाइन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती करण्यात येत आहे. परंतु आपल्या परिसरातील दररोजच्या घटना, बातम्या, त्यामुळे निर्माण झालेली भिती यामुळे अनेकांचे मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. अशा परिस्थितीत त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. हीच गरज ओळखून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना समुपदेशन हेल्पलाइन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट अहमदाबाद व एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना समुपदेशन हेल्पलाईन ची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र अनुभवी व तज्ञ समुपदेशक नेमण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त व स्थलांतरित कामगारांचा म्हणून ओळखला जात असला तरी हा जिल्हा संवेदनशील आहे. याठिकाणी सामाजिक मनोवैज्ञानिक समुपदेशनाची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय सोयी, सुविधा व योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी या समुपदेशन हेल्पलाइन ची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले. टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईचे संचालक प्रा. शालिनी भरत यांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजनातील अनुभवाच्या मदतीने झोकून काम करू आणि उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड काळातील परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी कोहिजन फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे ग्वाही फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले. या उपक्रमास सर्वतोपरी आर्थिक सहयोग देण्याचे आश्वासन एचडीएफसी परिवर्तन सीएसआर प्रमुख रितेश सिन्हा यांनी दिले.
कोरोनाच्या या परिस्थितीत आपणास भीती वाटतेय?, झोप येत नाही?, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास काय करावे, कुणाशी बोलावे, तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर काळजी करू नका आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत समुपदेशन करण्यात येणार आहे. हेल्पलाईन ला संपर्क करण्यासाठी खालीलप्रमाणे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

उस्मानाबाद – सोनाली गुजराथी ( ७४९८७०१७७९),
तुळजापूर – मनोहर दावणे ( ८७८८५३४७७०),
उमरगा – किरण कदम ( ९३७३८२७११५),
लोहारा – शुभांगी कुलकर्णी ( ८०८०२३४३२४),
परांडा – आनंद भालेराव ( ७६६६२९९६१७),
भूम – शंकर ठाकरे ( ७६६६२८४३०३
कळंब – गणेश चादरे ( ७६६६२९०६३६),
वाशी – सोनाली गुजराथी ( ७४९८७०१७७९)

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबादकोरोना समुपदेशन हेल्पलाईनजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद
Previous Post

सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयकपदी सरपंच मोहन पनुरे यांची निवड

Next Post

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षणशुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक – समाजातील सर्व घटकांनी \’एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी\’ या उपक्रमात सहभागी व्हावे – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांचे आवाहन

Related Posts

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

Next Post

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षणशुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक - समाजातील सर्व घटकांनी \'एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी\' या उपक्रमात सहभागी व्हावे - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!