Vartadoot
Sunday, August 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/08/2026
in आपला जिल्हा
A A
0
पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Ad 10

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत सिद्धेश्वर महिला प्रभाग संघाशी संलग्न असलेल्या ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघ, पोहनेर’ येथे आज वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाली.
धाराशिव तालुक्यातील पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या ​कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, राष्ट्रगीत गायन, ‘वंदे मातरम्’ आणि तिरंगा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. यानंतर गावात उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. सभेच्या मुख्य सत्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


​सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुका व्यवस्थापक (IBCB) श्री. तेजस कुलकर्णी म्हणाले की, “उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याचा योग्य वापर करून महिलांनी स्वतःचे नवीन व्यवसाय सुरू करावेत आणि चालू असलेल्या व्यवसायांची व्याप्ती वाढवावी.”
​तालुका व्यवस्थापक (MIS) श्री. दत्तात्रय शेरखाने यांनी ‘उमेद’ अभियानाची संकल्पना सविस्तर मांडली. गावातील वंचित कुटुंबे व महिलांनी स्वयंसहाय्यता समूहात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘लखपती दीदी’ मोहिमेची माहिती देऊन गावातील जास्तीत जास्त महिलांनी ‘लखपती दीदी’ व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.


​यावेळी प्रभाग समन्वयक श्रीमती शीतल गोरे यांनी गटबांधणी, मिळालेल्या कर्जाचा योग्य विनियोग, आर्थिक नोंदी व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे आणि सर्व गट ऑनलाइन प्रणालीवर आणणे याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रभाग संघ व्यवस्थापक श्रीमती अलका मोरे यांनी प्रास्ताविकातून गावातील एकूण बचत गट, मिळालेला निधी आणि नवीन गटांची माहिती दिली. तसेच सीआरपी (CRP) स्वाती मोरे यांनी मागील वर्षातील कामाचा आढावा सादर करून पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन मांडले.
​याप्रसंगी ग्रामसेविका शिंदे मॅडम यांनी ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या विविध योजना व निधीवर माहिती दिली, तर बालविकास विभागाच्या सुपरवायझर मॅडम यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांवर मार्गदर्शन केले.


​या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नेटके संयोजन ग्राम संघाच्या अध्यक्षा शशिकला धावारे आणि सचिव मोहिनी धावारे यांनी प्रभाग समन्वयक शितल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने केले. या सभेला गावातील बचत गटांच्या सर्व महिला, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही सभा यशस्वीरीत्या पार पडली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामसंघपोहनेर
Previous Post

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

Next Post

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

Related Posts

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
Next Post
माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's