Vartadoot
Monday, July 27, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु – सर्व आठवडी बाजार व धार्मिक स्थळेही राहणार बंद

admin by admin
11/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू असेल. या दिवशी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद असतील. सर्व धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं आणि मंदिरंही दर रविवारी बंद असतील असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी (दि.१०) दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद करण्यात येत आहेत, संपूर्ण जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करावे लागेल, या दिवशी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहतील, तथापि रुग्णालयाशी संलग्न असलेले मेडिकल्स चालू ठेवता येतील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे दर रविवारी बंद राहतील. धार्मिक विधीमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. तसेच धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी “ नो मास्क, नो एन्ट्री ” नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक हे 50 टक्के क्षमतेने वैयक्तिक सरावासाठी चालू ठेवण्यास परवानगी राहील. या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक या ठिकाणी मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यास व प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक येथे तपासणीमध्ये 50 टक्के क्षमतेचे व कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास ती जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

15 मार्च पासून मंगल कार्यालयं बंद
सर्व सामाजिक, राजकीय, निदर्शने, मोर्चा आदीनाही पुढील आदेशापर्यत मनाई राहील. भाजीमंडईमध्ये सामाजिक अंतराचे पालन होईल. याअनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच दि. 15 मार्च 2021 पासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल्स, लॉन्स बंद राहतील.

रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी
जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका, नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये आज दि. 10 मार्च 2021 पासून पुढील आदेशापर्यंत रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत रात्रीची संचार बंदी राहील. या कालावधीत सर्व अत्यावश्यक बाबी (आरोग्य विषयक सुविधा, प्रवासी वाहतूक ) वगळून व्यक्तींच्या हालचालींना कडक प्रतिबंध राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद जिल्हाकोविड १९रविवारी जनता कर्फ्यु
Previous Post

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लोहारा तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम

Next Post

लोहारा तालुक्यातील नागराळ-हिप्परगा रस्त्यावरील पुलाच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील नागराळ-हिप्परगा रस्त्यावरील पुलाच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's