वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी (दि.६) सकाळी एक बिबटया मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा बिबट्या बेशुद्ध होऊन त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी सकाळी बिबट्या आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. उपस्थितांनी ही माहिती वनविभागाला कळविली. बेशुद्ध झालेला बिबट्या काही वेळाने मृत्युमुखी पडल्याचे समजते. वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर या बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजणार आहे. वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नर बिबट्या असून अंदाजे तीन वर्षे वय असावे अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.