मुरूम :
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी (ददि. ९) कवी व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मल्लिनाथ घाळे होते. यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, व्हाईस चेअरमन शरणाप्पा मुदकण्णा, संचालक अशोक जाधव, विनोद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विविध घटना व प्रसंगावर आधारित प्रा. विश्वजीत अंबर, सहशिक्षक रूपचंद ख्याडे, विजयकुमार देशमाने, मोहन जाधव, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, तंत्रस्नेही सहशिक्षक सुनील राठोड, शुभम वरनाळे, शिवशरण वरनाळे आदींनी कविता सादर केल्या. यावेळी ख्याडे यांनी ‘ गुळाने दाखवला, साखरेला ठेंगा, गेले तुझे दिवस, नको करू दंगा. ‘ बेघर आम्ही ही कविता कोरोना संसर्गाच्या कालावधीत देशमाने यांनी या कवितेतून पक्षी म्हणाले, केलात तुम्ही वृक्षतोड, आम्ही कोठे राहायचे ? तर सुनील राठोड यांनी बुडगा या कवितेच्या माध्यमातून ‘मनातील तीव्र इच्छा साठवून, स्वतःचे सांत्वन करतो आठवून,अंगणात खेळणाऱ्या मुलांना पाहून, भासे मीही बसलो आहे खेळून.’ याप्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.नितीन डागा,अमृत वरनाळे, डॉ.सुधीर पंचगल्ले, सुधाकर म्हेत्रे, बाबासाहेब पाटील आदिंची विशेष उपस्थिती होती. शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, धीरज मुदकण्णा, सचिन कंटेकूरे, राजू मुदकण्णा,महांतय्या स्वामी,संतोष शेळके,गुंडेराव गुरव आदींनी पुढाकार घेतला. यावेळी दत्तात्रय इंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून वाचन संस्कृती जोपासू या असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार बालाजी भोसले यांनी मानले.