वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी दि. 8 जुलै रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन किमान 28 दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील लोहारा, मुरूम, सास्तुर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, कळंब, परांडा उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या 12 केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच 18 ते 44 वयोगटातील ज्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहे अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.
तसेच जिल्ह्यातील सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्र, उस्मानाबाद येथील 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या एकूण 46 केंद्रावर 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधारकार्ड सोबत घेऊन जावे किंवा पहिला डोस घेतला त्यावेळी नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ ज्या लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.

No Result
View All Result
error: Content is protected !!