वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शनिवारी ( दि. २०) सावित्रीच्या लेकी विशेषांक प्रकाशन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, डॉ. अनिता मुदकण्णा यांच्यासह अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाअस्मिता कांबळे ह्या आहेत. या कार्यक्रमासाठी अणदूर येथील जानकी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी अहंकारी, पुणे येथील उद्योजिका अनिता गालफोडे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंके, उस्मानाबाद काँग्रेस (आय) च्या महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी गायकवाड, तुळजापूर पंचायत समितीच्या सदस्या वैशाली मुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, डॉ. अनिता मुदकण्णा, डॉ. जयश्री घोडके, डॉ. आकांक्षा गायकवाड, लता बंडगर, प्रज्ञा शेंडे, संगीता शहा, प्रा. अवंती सगर, बाबई चव्हाण, गोदावरी क्षीरसागर, वैशाली घुगे, सानिया शेख, क्रांती पाटील, नागिनी सुरवसे, जोशीला लोमटे, शाहिदाबी सय्यद, अन्नपूर्णा मोरे, बबिता महानोर, वर्षा पाटील, कस्तुरा कारभारी, सुनंदा खोबरे, अनिता काळुंके, प्रियंका पासले, वंदना घोडके, पुष्पा क्षीरसागर, सीमा दुधगी, कविता पुदाले, आशाबी शेख आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. वत्सला नगर अणदूर येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात रविवारी (दि.२०) दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.