वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी व तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग या संस्थांच्या अडचणी विषयी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश दाजी बिराजदार यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. सदरील संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन ना. बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले.
काही वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य आधार असलेली उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आली आहे. ढोकी येथील तेरणा व नळदुर्ग येथील तुळजाभवानी हे दोन साखर कारखाने सुरू झाले तर जिल्हा बँक पूर्वपदावर येऊ शकते. त्यामुळे या संस्थांच्या अडचणी संदर्भात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश (दाजी) बिराजदार यांनी नुकतीच सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी या संस्थांबाबत सविस्तर चर्चा झाली. या संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहाऱ्याचे माजी तालुकाध्यक्ष किशोर साठेही उपस्थित होते.