Vartadoot
Monday, July 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव – उद्या दुपारी १२ वाजता घटस्थापना

admin by admin
25/09/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ दि.१७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. उद्या सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी १२.०० वाजता घटस्थापना तर सायंकाळी अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात दि. २६ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक, विधी व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवगावकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई शक्ती देवता श्री तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी शारदे नवरात्र महोत्सव २०२२ ची दि.१७ सप्टेंबरपासून सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रेपासून महोत्सवास सुरुवात झाली आहे. सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते व सर्व मानकरी, पुजारी व पाळेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. तर मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीचीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरविण्यात येणार आहे. तसेच बुधवार ‌दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा नैवेद्य आरती व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. तर गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी श्रीदेवीची अभिषेक पंचामृत रथ अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती व सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी ललित पंचमी दिनी श्री देवीजींची पंचामृत मुरली अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत शेषशाही अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत भवानी तलवार अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर सोमवार दि.३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी दिनी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा सायंकाळी ११.३० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ तर दुपारी ४.४५ मिनिटांनी पूर्ण होतील व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी (खंडे नवमी) श्री देवीजींची नित्योपचार महापूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर अजाबली आपली व घटोत्थापन (घट उठविणे) दिवसभर नैवेद्य, दर्शन व रात्री पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींची शिबिकारोहन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा विजयादशमी सार्वत्रिक सिमोल्लंघन तसेच रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा दिनी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना नित्योपचार पूजा ,अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्रीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा व सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, सोलापूर काठ्यासह आरती व रात्रीचे छविना मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक पूजा, विधी व सेवा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

तुळजाभवानीच्या ऑनलाईन दर्शनासाठी Online Puja – seva visit at WWW.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरुन दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: तुळजापूरतुळजाभवानीनवरात्र महोत्सव
Previous Post

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव – उद्या दुपारी १२ वाजता घटस्थापना

Next Post

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात आयोजित दिव्यांग शस्त्रक्रिया शिबिरात ६७ दिव्यांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Related Posts

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
Next Post

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात आयोजित दिव्यांग शस्त्रक्रिया शिबिरात ६७ दिव्यांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's