वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पार्थ मल्लिकार्जुन कलशेट्टी याची नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे. नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती यांनी त्याचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, खिजर मोरवे, अनंत कानेगावकर, सुनंदा निर्मळे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, हारून हेड्डे यांनी पार्थ कलशेट्टी यास वेळोवेळी मार्गदर्शन केले.