वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कळंब येथील सोजर मतिमंद निवासी शाळा येथे प्राणी व पक्ष्यांकरिता शाळा परिसरात पाण्याची सोय करण्यात आली आहे. पाणी हौद व पक्षांसाठी धान्य कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. व्याकुळ झालेल्या प्राणी व पक्षांना सहज पाणी पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे.
सर्वप्रथम कला शिक्षक यांनी आपापल्या कल्पनेतून पक्षी जेथे येतात तेथे घरटी तयार केली. सुनील काळे यांनी धान्य कुंड्या, महादेव शिंगारे यांनी पाणी पिणेसाठी बाटली कट करून झाडावर लटकवली, विजय थोरे यांनी ज्वारीची कणसे झाडावर ठेवली, नितीन सूरवसे यांनी घरटे केले. बारबोले यांनी मातीचे बोलके व झाकनित पाणी भरून झाडावर, छतावर ठेवले. त्यानंतर प्राणी व पक्षी यांची पाण्याविना व धाण्याविना परवड होऊ नये यासाठी आम्ही सर्व जण काळजी घेऊ अशी शपथ घेण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.