वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात भरटकत आलेल्या वारकरी पक्षाला माजी नगरसेवक तथा सर्पमित्र श्रीनिवास फुलसुंदर यांनी भदभदी नदीतील पाण्यात सोडून जीवदान दिले.
मंगळवारी (२० सप्टेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास शहरातील शिवलिंग साखरे हे मॉर्निंग वाॅकला निघाले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील माऊली ज्वेलर्ससमोर एक पक्षी जमीनीवर बसलेला त्यांना दिसून आला. साखरे यांनी या पक्षाला कुतुहलाने पाहिले. नागरी वस्तीत आल्याने पक्षी भेदरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे साखरे यांनी तत्काळ शहरातील सर्पमित्र श्रीनिवास फुलसुंदर यांना सपंर्क करून बोलावून घेतले. हा वारकरी जातीचा पक्षी असल्याचे सर्पमित्र फुलसुंदर यांच्या लक्षात आले. त्यांनी या पक्षाला ताब्यात घेतले. या पक्षाचा वावर पाण्यातही राहात असल्याने त्याला भदभदी नदीकाठच्या सिमेंट बंधाऱ्यात सोडून दिले. यावेळी कृषी सहायक शैलेश जट्टे, निसर्ग संवर्धन संस्थेचे विरेश स्वामी, कृष्णा पोतदार उपस्थित होते.
———-
वारकरी पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. अंगाने लहानखुरी भुंडी असते. पाण्यात तरंगताना दुरून बदकासारखा दिसतो. कपाळावर चांदीसारखा टिळा असतो. त्याची चोच हस्तीदंतासारखी पांढरी असते. ह्यावरून तिची ओळख पटते. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी थव्याने आढळून येतात.
श्रीनिवास फुलसुंदर,
सर्पमित्र लोहारा