उमरगा प्रतिनिधी :- भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांचा भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे गुरुवारी (दि.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांनी सत्कार केला.
भारतीय जनता पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष फरीद आत्तार, शहराध्यक्ष खाजा मुजावर, बंजारा सेल जिल्हा कार्याध्यक्ष प्रतापसिंह राठोड, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, सतीश सरवदे, अनिल व्हंताळकर आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.