वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेच्या ( मेस्टा ) वतीने शुक्रवारी (दि.५) इंग्रजी शाळांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेच्या ( मेस्टा ) वतीने उस्मानाबाद जिल्हा सचिव शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा यांना इंग्रजी शाळांच्या विविध समस्यांचे निवारण करणेबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना -१९ मुळे मागील १ वर्षांपासून शिक्षण सुरू शाळा बंद या उपक्रमामुळे आणि शिक्षणमंत्री यांच्या स्वयं अर्थसहाय्यित शाळांबाबत चुकीच्या धोरण व निर्णयामुळे संस्थाचालक यांच्यापुढे शाळेतील शिक्षकांच्या पगारी कशा करायच्या, स्कूल बसचे टॅक्स व इन्शुरन्स कसे भरायचे, शाळेच्या इमारतीसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे कोव्हीड -१९ लॉकडाऊन काळातील थकीत वीजबिल देयके कसे भरायचे अशा विविध समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवानंद स्वामी, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, हारूण हेड्डे, परमेश्वर जाधव, अनंत समदळे, सविता जाधव, पूजा दाळिंबकर, शीतल खराडे यांच्यासह इंग्लिश स्कूल संस्थाचालक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.