वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती लोहारा येथे मंगळवारी (दि.२) सुंदर माझे कार्यालय उपक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कार्यालयीन कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांची आढावा बैठक गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये गट विकास अधिकारी सोपान अकेले यांनी अभियानाचे उदिष्ट व साध्य यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच अभियाना अंतर्गत चालू असलेल्या विविध निर्देशांकांचे कामाचा आढावा घेऊन संबधिताना काम पूर्ण करून घेणे बाबत सूचना दिल्या. तसेच इज ऑफ लिविंग, मिशन अंत्योदय, गाव दारिद्र्य निर्मुलन आराखडा १०० टक्के पूर्ण केले बदल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम दि. २२ जानेवारी ते २० मार्च २०२१ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रम अंतर्गत कर्मचारी वृंद कार्यरत असणाऱ्या आस्थापना विभाग मध्ये परिसर स्वच्छ्ता राखणे, ओला व सुखा कचरा वेगळा करणे इत्यादी उपक्रम राबविणे बाबत सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली उपस्थित उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी पंचायत समिती लोहारा परिसराची स्वच्छता केली. या वेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर चौगुले, विस्तार अधिकारी श्रीनिवास पाटील, लेखाधिकारी आर. जे. नवघडे, शरण माळी, उमेद अभियानाचे अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, सौरभ जगताप यांच्यासह तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते.