वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आला आहे.
पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज (दि. १५ जुलै) शेवटची मुदत होती. आतापर्यंत राज्यातील सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध, इंटरनेटच्या अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने मुदतवाढीचा हा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे दि. २३ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. पीकविमा भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. राज्य सरकारने दिलेला मुदतवाढ प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.