Vartadoot
Friday, January 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रक्तदानाची चळवळ उभारणे ही काळाची गरज – रमाकांत जोशी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील शेखर अंबेकर यांनी केले १०० वे रक्तदान

admin by admin
01/02/2022
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यात घडणारे दररोजचे अपघात, गंभीर आजार अशांना रक्ताअभावी प्राण गमवावे लागते. तेंव्हा रक्ताचा तुटवडा ही राज्यासमोरील गंभीर समस्या असून या समस्येवर मात करणेसाठी रक्तदानाची चळवळ उभारणे ही काळाची गरज आहे असे मत सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी व्यक्त केले.
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात शेखर उर्फ भाऊसाहेब आंबेकर यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त १०० वा रक्तदान सोहळा साजरा केला. यावेळी आंबेकर स्वागत समिती व सास्तूर नगरीच्या वतीने श्री अंबेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात रमाकांत जोशी यांनी बोलताना आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ॲड. रावसाहेब पाटील होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळूंके, लोहारा नगर पंचायतचे नगरसेवक जालिंदर कोकणे, संजय गोडसे, देविदास गोपणे, पोलिस निरीक्षक सुनिल काकडे, प्रसिद्ध लेखक प्रा. फ.म शहाजिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, बाबा शेख, सलमान सवार, सचिन रणखांब यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबेकर यांनी १०० वेळा रक्तदान करून सास्तूरचे नाव राज्यात प्रसिद्ध केले आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन शहाजिंदे यांनी केले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना आम्ही अंबेकरांचा आदर्श घेऊन काम करू असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी अंबेकर यांनी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्याला रक्तदान करण्याचा आदेश काढावा जेणेकरून रक्त तुटवड्याची समस्या कायमची संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी १८ युवकांनी रक्तदान करून अंबेकरांना सुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित कोथिंबीरे यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी नादरगे यांनी तर रविकांत बनसोडे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सास्तूरचे सरपंच व समितीचे स्वागताध्यक्ष यशवंत कासार, सदस्य सुनिल शिंदे, अशिष वाघमारे, धीरज बेळबकर, नाट्य अभिनेते वाय. एस. शिंदे, वाघंबर सरवदे, चंद्रकांत जगदे, श्रीमंत सूर्यवंशी, शिवसेना शाखा प्रमूख मुरली पवार, श्रीकृष्ण रक्तपेढीचे व स्पर्श रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरीक, युवक उपस्थित होते.

———–
रक्तदान करण्याबाबत आजही समाजात अनेक समज गैरसमज आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून अनेकदा रक्तदान करण्याबाबत आवाहन केले जाते. परंतु म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परंतु शेखर आंबेकर यांच्या १०० वेळा रक्तदान करण्याच्या संकल्पातून प्रेरणा घेऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

Tags: रक्तदान
Previous Post

लोहारा शहरातील डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप – शहरातील मसणजोगी वस्तीतील २७ कुटुंबांना केले वाटप

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवराष्ट्र आघाडीकडून वैशाली खराडे यांचा तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांचा अर्ज दाखल – १४ फेब्रुवारीला होणार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड

Related Posts

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड
लोहारा तालुका

गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड

20/12/2025
लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

18/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवराष्ट्र आघाडीकडून वैशाली खराडे यांचा तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांचा अर्ज दाखल - १४ फेब्रुवारीला होणार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's