वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठा समाजाच्या आरक्षणसंदर्भात मागील दोन तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आज छत्रपती संभाजीराजे व प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार आहे. या भेटीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार असल्याने आजचा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनाला कलाटणी देणारा असल्याचे बोलले जात आहे. शिव शाहूंचे वंशज, मराठा समाजाचे आशा स्थान, छत्रपती संभाजी महाराज घेणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाजाची भेट… यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला स्वतः होऊन त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर इतिहास घडला… त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज होणार आहे.
मराठा आरक्षणाचा लढा जातीपातीच्या कक्षा ओलांडून पुढे जात आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांची साथ घेऊनच मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकतो, ही दूरदृष्टी संभाजीराजेंनी ठेवली आणि सर्वांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्याचाच एक भाग आजची प्रकाशजी आंबेडकरांची भेट. संभाजी महाराज हे बहुजनांच्या मनात काय चाललय याचा अचूक वेध घेणारे नेतृत्व आहे. अठरापगड जाती, बारा बलुतेदार, व सर्व बहुजन समाज एकत्रित गुण्या गोविंदाने राहिला पाहिजे ही संभाजीराजांची भूमिका भूमिका आहे. छत्रपती संभाजीराजे आज सायंकाळी चार च्या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांचे स्वीय सहाय्यक योगेश केदार यांनी दिली आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!