वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील मार्डी येथे रविवारी (दि.३१) ‘वाण आरोग्याचं’ मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा पाटील यांनी केले होते. यावेळी डाॅ. स्वप्नील भोसले, परमेश्वर जाधव यांनी महिलांची तपासणी करून मोफत आयरनच्या टॅबलेट तसेच मल्टी विटामीन चे सिरप वाटप केले. यावेळी डाॅ. स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, साधारण १०० महिलांच्या मागे दहा महिलांना रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याची दाट शक्यता असते. ‘वाण आरोग्याचं’ या शिबिरात साधारणत दीडशे महिलांची तपासणी करण्यात आली. यातील पाच महिलांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे दिसुन आले. तसेच कॅल्शियमची कमतरता असलेल्या महिलांची संख्या जास्त होती. या कार्यक्रमासाठी आयोजक मनिषा पाटील, मीनाताई दत्तात्रय पाटील, रोहीणी पाटील, गीतांजली पाटील, मिना उदगिरकर, अंजली जाधव, पुजा सतपाळ, चिमाताई ठाकुर, आरती पाटील आदी उपस्थित होते.