वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुक्यातील लोहारा (खु) येथील युवकांनी लोकसहभागातून गावातील ३०० कुटुंबांना स्टीमर वाटपाचा उपक्रम राबविला. मंगळवारी ( दि. १८) हा उपक्रम राबविण्यात आला.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील लोहारा (खु) गावातील तरुण, अबालवृधानी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन गावात संसर्ग वाढू दिला नाही. अजूनही कोरोनाचे हे संकट दूर झाले नाही. त्यामुळे आणखीन सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून गावातील युवकांनी स्टीमरचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी ( दि. १८) नागरिकांना कोरोना संकटापासुन सुरक्षित राहण्यासाठी व आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावातील गरजू ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ए. अकेले, सरपंच सचिन रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, कृषी सहाय्यक निळकंठ पाटील, ग्रामसेवक जी. डी. कोकाटे, पोलिस पाटील बीरूदेव सुर्यवंशी, विकास सोसायटीचे चेअरमन मुकुंद इंगळे, माजी चेअरमन भास्कर रसाळ, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लोकसहभाग व नाविन्यपुर्ण संकल्पनेतून मदत करण्याचे आवाहन बालाजी सूर्यवंशी यांनी तरुणांना केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण सुर्यवंशी, अजय रसाळ, सचिन बाळू रसाळ, खंडेराव मुरटे, सुग्रीव पाटील, संभाजी पाटील, विकास प्रकाश पाटील, श्रीहरी रसाळ यांच्यासह स्वप्नपुर्ती समूहचे अरविंद रसाळ, राजमुद्रा समुहचे अर्जुन रसाळ, हणमंत मुरटे, अजय रसाळ, रोहण जमादार, व सह्याद्री समुहाचे भास्कर रसाळ, गणेश पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच नितिन सूर्यवंशी, खंडू आरगड़े, व्यंकटेश सूर्यवंशी, प्रकाश हरिश्चंद्र रसाळ, नरहरी पाटील, प्रल्हाद रसाळ, शिवाजी पाटील, शिवाजी रसाळ, बालाजी पाटील, शिवशंकर लोखंडे, अमर जाधव, आप्पाराव सुर्यवंशी आदींनी विशेष सहकार्य केले.