Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुका शिक्षक पतसंस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न – उपस्थित मान्यवरांनी केले पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सह. पतसंस्थेची १८ वी वार्षीक सर्वसाभारण सभा रविवारी (दि.२८) भारत माता मंदीर लोहारा येथे चेअरमन राम मुसांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, हायस्कुल शिक्षक सोसायटीचे चेअरमन व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एल.जी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद, प्रत्येक केंद्रातुन एक गुववंत शिक्षक पुरस्कार, आदर्श सेवक, आदर्श शाळा व गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमानपत्र देउन गौरवण्यात आले. तसेच गुणवंत सभासद पाल्यांना प्रमानपत्र व वाचनिय पुस्तक देउन गौरवण्यात आले. कार्यक्रमात उपनगराध्यक्ष आयुब शेख, मनोहर वाघमोडे, एल.जी. चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले.

\"\"

पतसंस्थेचे एकुण भागभांडवल सात कोटी रूपये आहे. कर्जाचा व्याजदर ९% आहे. कर्ज मर्यादा दहा लक्ष रुपये आहे. तातडीचे कर्ज एक लक्ष रुपये आहे. कर्जदार सभासद कोणत्याही कारणाने मयत झाल्यास दहा लक्ष रुपये व डी.सी.पी.एस सभासद मयत झाल्यास साडे बारा लक्ष रुपये देण्याची कर्ज सुरक्षा योजना पतसंस्थेची आहे. एसएमएस सुविधा सुरु केली आहे. संस्थेच्या ईमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. पतसंस्थेची ही प्रगती पाहुन सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विकास घोडके यांनी केले. सुत्रसंचालन व्हाईस चेअरमन सुर्यकांत पांढरे यांनी केले. अहवाल वाचन सचिव व्ही.एस. चंदनशिवे यांनी केले. संचालक डी.एम. पांचाळ यांनी आभार मानले. यावेळी संचालक सी.जी. कदम, डी.एम. फावडे, सी.जी. माळी, जे.एम. गायकवाड, वर्षा माने, वंदना अकोसकर, गीतांजली मोटे यांच्यासह सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपीक रविंद्र कोकणे, सेवक किरण दासिमे यांनी परीश्रम घेतले.

Tags: वार्षिक सर्वसाधारण सभाशिक्षक पतसंस्था
Previous Post

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून मिळणार पुरस्कार – मंडळांनी ३० ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर – राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर - राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!