लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय माने, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे आणि कार्यालयीन अधिक्षक किशोर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय माने यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली व नंतर महाराष्ट्र गीत गायन झाले. तद्नंतर मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. रुपचंद खराडे यांनी केले. याप्रसंगी नॅक समन्वयक डॉ. किरण लोमटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. वैभव पतंगे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. अतुल बिराजदार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








