Vartadoot
Saturday, September 19, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
19/09/2026
in लोहारा तालुका
A A
0
एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम
Ad 10

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. यात गणेश मंडळांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु यावर्षीच्या गणेशोत्सवात लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मंडळाच्या आरतीला अनेक मान्यवर येतात. आरतीला येताना जे साहित्य खरेदी करण्यासाठी मान्यवर खर्च करतात. त्या ऐवजी आरतीला येताना एक वही एक पेन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून जे शैक्षणिक साहित्य जमा होईल ते होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा या मंडळाचा मानस आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
लोहारा शहरातील किंग कोब्रा मंडळाने हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या मागील संकल्पना सांगताना मंडळाने सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला. सर्व जण एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण व्हावी आणि यातूनच उज्वल भारत घडावा हा उद्देश होता. पण आजकाल मात्र सर्रास उलट होताना दिसत आहे. आज डी जे, अनावशक्य खर्च टाळून आमचे गणेश मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. त्यातीलच “एक वही, एक पेन” हा उपक्रम गणेश्याच्या आरतीला आपण विविध मान्यवरांना आमंत्रित करीत असतो. आरतीसाठी येत असताना मान्यवर खूप मोठा खर्च करीत असतात. सध्याची दुष्काळ परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. म्हणून आम्ही यावर्षी आरतीचा अनावश्यक खर्च टाळून होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही नवीन संकल्पना राबवीत आहोत. यातून गणपती दर्शनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांनी, सर्व गणेश भक्तांनी आरतीसाठी खूप मोठा खर्च न करता एक वही आणि एक पेन मंडळाकडे जमा करण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. यातून जमा झालेले जे शैक्षणिक साहित्य असेल ते आम्ही गणेश विसर्जना दिवशी किंवा त्यानंतर शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना ते देणार आहोत. यातून एक सामाजिक बांधिलकी जपली जाईल. त्याचबरोबर आम्हा सर्वांना एक समाधान, आनंद ही मिळेल आणि या उपक्रमाची निश्चितच इतरही सर्व गणेश मंडळांना प्रेरणा मिळेल हा आमचा छोटासा प्रयत्न असेल.


या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा या मंडळाचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांची खरच गरज आहे. यातून ईतरही गणेश मंडळांनी प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवावे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: किंग कोब्रा गणेश मंडळगणेशोत्सवलोहारा
Previous Post

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

17/09/2026
मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?
लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

17/09/2026
लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's