Friday, October 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे उपोषण आंदोलन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह संपूर्ण तालुक्याचे अत्यावश्यक असणारे अभिलेख रेकॉर्ड उमरगा तहसील कार्यालयातून ताब्यात घेऊन लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी नागरिक व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत या मागणीसाठी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (दि.१०) लोहारा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी रेकॉर्ड लवकर उपलब्ध करुन घेऊ असे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २३ वर्षे उलटली अद्यापही सन १९५३ पूर्वीचे जुने खासरा पाहणी पत्रक, फसली १३५७, ७/१२, ८ अ, उतारे, जनगणना, युनिट रजिस्टर यासह आदी अत्यावश्यक असणारी अभिलेख रेकॉर्ड, व कागदपत्रे उमरगा तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात असल्याने लोहारा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना जुन्या नकला व कागदपत्रे काढण्यासाठी उमरगा तहसील कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून हेलपाटे घालावे लागत आहे.
सतत उमरगा तहसीलमध्ये कागदपत्रे काढण्यासाठी जाऊन ही अभिलेख रेकॉर्ड सापडत नाही, शोध घ्यावा लागेल वेळ लागेल, उद्या या, परवा या, तुमचे रेकॉर्ड लोहारा तहसील कार्यालयात आहे तेथून घ्या असे तेथील कर्मचारी सांगत आहेत. त्यानंतर लोहारा तहसील कार्यालयात रेकॉर्ड मागणीसाठी शेतकरी व नागरिक आले असता सन १९५३ पूर्वीचे संपूर्ण रेकॉर्ड हे उमरगा तहसीलमध्ये उपलब्ध असून तुम्ही तेथून घ्या असे सांगितले जात असल्याने शेतकरी व नागरिकांची मोठी कुचंबना होत असून दोन्ही तालुक्याच्या तहसीलचे उंबरठे झिजवूनही रेकॉर्ड मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

\"उपोषण\"
त्यामुळे आपल्या स्तरावरून लोहारा तालुक्याचे अत्यावश्यक असणारे अभिलेख रेकॉर्ड उमरगा तहसील कार्यालयातुन हस्तगत करुन लोहारा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात उपलब्ध करुन देऊन शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी वारंवार केली होती. परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्या महसूल विभागाने आश्वासना शिवाय काहीच कार्यवाही न केल्याने शुक्रवारी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बालाजी यादव यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते. अखेर रेकॉर्ड लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बालाजी यादव, खंडू शिंदे, पद्माकर चव्हाण, स्वप्निल गुंड, अभिजीत सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, दयानंद चव्हाण, अमोल बिराजदार, यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

Previous Post

लोहारा येथील जि. प. शाळेत आनंद मेळावा – १२० स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली विविध पदार्थांची विक्री

Next Post

अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल – ५ गुन्ह्यांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल - ५ गुन्ह्यांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!