Vartadoot
Friday, January 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील तावशिगड येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्यांसह अनेक तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

admin by admin
06/07/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील तावशिगड येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते मंगळवारी (दि.५) प्रवेश देण्यात आला.
तालुक्यातील तावशिगड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गजानन राम मिटकरी, संजय बापूराव दंडगुले, प्रदीप हरिदास चेंडकाळे, महाराणा प्रताप संघटनेचे अध्यक्ष व्यंकट राजपूत, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष संजय मिटकरी यांच्यासह शिवसेना व काँग्रेस पक्षातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी त्यांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, विवेक घोगरे, महेश नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. एकीकडे राज्यामध्ये सत्तांतर झाले असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे चित्र लोहारा तालुक्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार सर्व जाती धर्मातील लोकांना पुढे घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा प्रवेश केला असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली.

यावेळी संतोष राजपूत, लखन राजपूत, अमित राजपूत, धारासिंग राजपूत, रमण राजपूत, अभय राजपूत ,धीरज राजपूत, किशोर हुडेकर, देवेंद्र दंडगुले, काकासाहेब मनोहर, गोविंद मनोहर, व्यंकट दंडगुले, नामदेव दंडगुले, राजेंद्र दंडगुले, सतीश बिराजदार यांच्यासह शिवसेना व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी गोविंदराव साळुंके, तावशीगड येथील माजी पंचायत समिती सभापती दयानंद थोरात, राष्ट्रवादी दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, अमोल थोरात, मधुकर कोळी, उमरगा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शमशुद्दीन जमादार, प्रकाश भगत, जयंत देशमुख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Tags: उस्मानाबादजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

दि. १३ जुलै ला होणार आरक्षण सोडत – २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश

Next Post

बकरी ईदच्या अनुषंगाने लोहारा शहरात रूट मार्च

Related Posts

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड
लोहारा तालुका

गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड

20/12/2025
लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

18/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
Next Post

बकरी ईदच्या अनुषंगाने लोहारा शहरात रूट मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's