Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे तालुकास्तरीय एकदिवसीय सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक कार्यक्रम

admin by admin
01/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत तालुक्यातील बेंडकाळ येथे बुधवारी (दि.३१) तालुकास्तरीय सेंद्रीय निविष्ठा प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी बायोगॅस आणि विहीर या योजनेची माहिती दिली.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत सन २०१९-२० पासुन लोहारा तालुक्यात बचत गटातील महिला शेतकरी यांच्यासाठी सेंद्रीय शेती अभियान चालु आहे. त्या अंतर्गत आजपर्यंत तालुक्यात एकुण २७ गावामध्ये २० सेंद्रीय शेतकरी गट कार्यरत आहेत. सेंद्रीय शेती करत आहेत. तालुका समन्वयक नरेंद्र गवळी यांनी सेंद्रीय शेती करत असताना माती परीक्षण, उगवण क्षमता, बिज प्रक्रीया करून घरचे बियाणे पेरणी करावी तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रीय निविष्ठा दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डीकंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, रंगीत सापळे, कामगंध सापळे, गांडुळ खत इ. सेंद्रीय निविष्ठांचे वापर कसे करावे याची माहिती दिली. या एकदिवसीय सेंद्रीय प्रात्यक्षिक निविष्ठा उत्पादन कार्यक्रमामध्ये तालुका कृषि अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी कृषि विभागाच्या सर्व योजनेची माहिती देवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, सरपंच सुरेखा अनंत गोरे यांनी सेंद्रीय निविष्ठांची पाहणी करून उपस्थित महिला शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. सेंद्रीय शेती निविष्ठा उत्पादन प्रात्यक्षिक कार्यक्रम तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, लोहारा अंतर्गत प्रभाग समन्वयक प्रदिप चव्हाण, शिवशंकर कांबळे, कृषि व्यवस्थापक किशोर हुडेकर, सचिन गायकवाड, कृषि सखी, सीआरपी यांनी सेंद्रीय निविष्ठा प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व खरीप पूर्व शेतीचे नियोजन, शेतीला कधी वेळ दिला पाहिजे, शेतीचे अचूक सुत्र सांगत शेतामध्ये नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ जगताप यांनी तर आभार किशोर हुडेकर यांनी मानले. सेंद्रिय शेतीचे प्रदर्शन भरविण्यासाठी बेंडकाळ येथील कृषी सखी लक्ष्मी कल्याण मोरे, गीता गोरे, प्रभाग कृषी समन्वयक प्रदीप चव्हाण कांबळे, प्रभाग कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड, किशोर हुडेकर , तसेच कानेगाव प्रभागाचे सि एल एफ मॅनेजर मंगल ताई, स्वयंम शिक्षण प्रयोगचे तालुका कॉडिनेटर शिल्पा वेलदोडे यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: सेंद्रिय शेती
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वामन भोरे यांची बिनविरोध निवड

Next Post

लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's