वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत असले तरी अनेक ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. याच जाणिवेतून लोहारा तालुक्यातील भातागळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने संपूर्ण भातागळी गावात घरोघरी जाऊन जवळपास तीन हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
मागील अनेक दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. सद्यस्थितीतही कोरोनाचे रूग्ण कमी अधिक प्रमाणात बहुतांश ठिकाणी अद्यापही आढळून येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस ग्रामस्थ, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, सार्वजनिक ठिकाणी जाताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून लोहारा तालुक्यातील भातागळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने संपूर्ण भातागळी गावात घरोघरी जाऊन जवळपास तीन हजार मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच मास्कचा वापर करावा, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी सुरेश कारभारी, अभिषेक जगताप, आकाश जगताप, किरण गिराम, स्वप्निल जगताप, ओम फत्तेपुरे, तानाजी कदम, दादा जगताप, कृष्णा फत्तेपुरे आदी उपस्थित होते.